Saturday, July 25, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळाला भाव?

Onion Price : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळाला भाव?

राहाता (तालुका प्रतिनिधी)

राहाता बाजार समितीत गोणीतील कांद्याला जास्तीत जास्त 2000 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 2839 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1600 रुपये ते 2000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1000 ते 1550 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 700 रुपये ते 1200 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 300 रुपये ते 600 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या 390 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 151 रुपये ते 225 रुपये. डाळिंब नंबर 2 ला 101 रुपये ते 150 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये. डाळिंब नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये. सीताफळाची 644 क्रेट्सची आवक झाली. 10 ते 30 रुपये, तर सरासरी 20 रुपये. ड्रॅगन फ्रुट ची 46 क्रेट्स ची आवक झाली. ड्रॅगन फ्रुटला 65 ते 80 रुपये, तर सरासरी 70 रुपये. पेरू ची 133 क्रेट्स ची आवक झाली. पेरूला 10 ते 20 रुपये, तर सरासरी 15 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana सुरगाणा तालुक्यातील सराड, घागबारी, वाझुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे दिगर, भिंतघर आणि जामनेमाळ या परिसरात आज (शनिवार) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान...