Friday, October 11, 2024
Homeनगर5 लाख 62 हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या

5 लाख 62 हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात धिम्म्या गतीने रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या सुरू आहेत. आधी परतीचा, त्यानंतर अवकाळी पावसाने तडाखा दिल्यानंतर गेल्या 15 दिवसांपासूनचे ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील पेरण्याचा वेग मंदावला आहे. असे असले तरी आठ दिवसांत जिल्ह्यात 50 हजार हेक्टरच्या जवळपास पेरण्या झाल्याने पेरण्याची एकूण आकडेवारी ही 5 लाख 62 हजार हेक्टरपर्यंत पोहचली आहे. यात ऊस, कांदा, चारा पिके, भाजीपाला वगळून 3 लाख 25 हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

- Advertisement -

यंदा परतीच्या पावसाच्या दणक्यामुळे रब्बी ज्वारीच्या पेरण्यावर मोठा परिणाम झालेला आहे. मात्र, ज्वारी पेरणीचा 15 ऑक्टोबरचा कालावधी संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी झालेली आहे. ज्या शेतकर्‍यांची शेती विहीर बागायत अथवा पाण्याचे अन्य स्त्रोत उपलब्ध आहेत, त्यांनी उशीराच्या ज्वारी पिकाच्या पेरणीला पसंती दिली.

आहे. यामुळे ज्वारीचे क्षेत्र 1 लाख 84 हजार 363 हेक्टरपर्यंत पाहचले आहे. दुसरीकडे गव्हाच्या पेरणीचे क्षेत्र वाढत असून आतापर्यंत सरासरीच्या 55 हजार 300 हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. पेरणीची टक्केवारी 97 टक्के आहे. यासह हरभरा पिकाची पेरणी 68 हजार 371 हेक्टरपर्यंत पोहचली असून पेरणी टक्केवारी ही 45 टक्के झाली आहे. जिल्ह्यात अनेक भागात उशीर पेरणी झालेल्या ज्वारी पिकावर जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिकटा या रोगाचा प्रार्दभाव झालेला दिसत आहे. यंदा अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकचे क्षेत्र कमी होवू शेतकरी कांदा पिकाकडे वळाले आहे.

झालेली पेरणी हेक्टरमध्ये

ज्वारी 1 लाख 84 हजार 363 (39 टक्के), गहू 55 हजार 33 (97 टक्के), मका 17 हजार 507 (49 टक्के), हरभरा 68 हजार 371 (45 टक्के), करडई 46 (7 टक्के), ऊस लागवड 54 हजार 288 (53 टक्के), चारा पिके 47 हजार 375, कांदा 1 हजार 20 हजार 297, बटाटा 279, टोमॅटो 688, भाजीपाला पिके 9 हजार 211, मसाला पिके 120, औषधी, सुगंधी वनस्पती 24, फुलपिके 690 आणि फळपिके 3 हजार 473 हेक्टरवर पेरणी अथवा लागवड झालेली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पेरणीत गहू, हरभरा, ऊस आणि कांदा लागवड आणि चारा पिके या पाच पिकांचे क्षेत्र सव्वा तीन लाख हेक्टरच्या पुढे आहे. त्यातच आता बोचर्‍या थंडीला सुरूवात झाली असून गहू आणि हरभरा पिकांच्या पेरण्याचे क्षेत्र वाढण्यासोबतच पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या