लातूर
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला. या पत्रकार परिषदेत छावा संघटना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.
विधान परिषदेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळं छावा संघटनेचे कार्यकर्ते पत्रकार परिषदेत घुसले आणि त्यांनी गोंधळ घातला. तसेच त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नावाने घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
- Advertisement -
तटकरेंवर पत्ते फेकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.




