धुळे । प्रतिनिधी dhule
शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील विटाई येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यात लाठ्याकाठ्या, फावड्यांचा सर्रास वापर करण्यात आला. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून 91 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विशाल रविंद्र खैरनार (रा.चक्की गल्ली,विटाई) यांनी नरडाणा पोलिसात (police) दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील भांडणाची कुरापत काढून दि.3 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास अशोक पवार, शामकांत पवार, पुष्पाबाई पवार, आसाराम पवार, मन्साराम पवार, निळकंठ पवार, विनोद पवार, अरुण पवारसह 41 जणांनी लाठ्या-काठ्या,लोखंडी फावड्यांनी विशालचा चुलतभाऊ प्रितम खैरनार, नामदेव खैरनार,लिलाधर खैरनार यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत जखमी केले. तसेच विनोद पवार व शामकांत पवार या दोघांनी विशाल याच्या गळ्यातील 25 ग्रॅम सोन्याची चैन ओढून घेतली.
तर परस्परविरोधात सौ.पुष्पा अशोक पवार हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी व तिचा पती अशोक पवार हे दोघे घराच्या ओट्यावर गावातील मुतारी मिटींग न घेता परस्पर काढून टाकली अशी चर्चा करत होते,परंतु आम्हाला बोलत आहे असा संशय घेवून विशाल खैरनार, लिलाधर खैरनार, प्रितम खैरनार, संदीप खैरनार, रविंद्र खैरनार, भगवान खैरनार, नामदेव खैरनार, गणेश खैरनार, सचिन शिरसाठ, अमोल खैरनार यांच्यासह 50 जणांना लाठ्या काठ्या, फावडे घेवून विनोद पवार,अशोक पवार, अमोल पवार,शामकांत पवार, संभाजी पवार, मन्साराम पवार यांना मारहाण करुन जखमी केले. तसेच प्रितम व विशाल खैरनार या दोघांना पुष्पा पवार यांचा मुलगा विनोद याच्या गळ्यातील 10 ग्रॅम सोन्याची चैन जबरदस्तीने ओढून घेतली. नरडाणा पोलिसात संशयतांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राम दिवे आणि मनोज कुवर हे करीत आहेत.