Thursday, January 29, 2026
HomeनाशिकNashik Surgana News : सुरगाणा नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत वाघमारे बिनविरोध

Nashik Surgana News : सुरगाणा नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत वाघमारे बिनविरोध

सुरगाणा | वार्ताहर | Surgana

येथील सुरगाणा नगरपंचायतीच्या (Surgana Nagar Panchayat) रिक्त झालेल्या जागेवर नुकतीच पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीत (By Election) भारतीय जनता पार्टीच्या सुमन नागू पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेना शिंदे गटाच्या राधाबाई विश्वास वाघमारे या बिनविरोध (Unopposed) निवडून आल्या आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले; तर इतर धरणांतील असा आहे पाणीसाठा

YouTube video player

या निवडणुकीत सुरगाणा शहरातील जनतेने वाघमारे कुटुंबाला मोठी पसंती देत पुन्हा चौथा सदस्य नगरसेवक म्हणून निवडून दिला आहे. शहरातील सुरगाणा नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष म्हणून भारत वाघमारे आहेत. तर त्यांच्या आई नगरसेविका, एक मुलगा नगराध्यक्ष आणि दोन सुना नगरसेविका आहेत. या बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित नगरसेविका राधाबाई विश्वास वाघमारे यांचा सत्कार दिपक थोरात यांनी केला.

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात आतापर्यंत ‘इतक्या’ महिलांनी भरले ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज

दरम्यान, यावेळी मुख्य अधिकारी डॉ. सचिन पटेल, नगराध्यक्ष भरत वाघमारे, उपनगराध्यक्ष माधवी थोरात, नगरसेविका पुष्पाबाई वाघमारे,प्रमिला भोये, अरूणा वाघमारे, योगिता पवार, गटनेते सचिन आहेर, नगरसेवक भागवान आहेर, स्वीकृत नगसेवक राजू बाबा शेख, अकील पठाण, आझाद शेख, अर्जुन शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी माजी आमदार जे.पी.गावित, दिडोरी लोकसभाप्रमुख सुनील पाटील यांनी वाघमारे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ajit Pawar Funeral : अलविदा दादा! उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन; शासकीय...

0
बारामती | Baramati राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं काल (बुधवारी) सकाळी ८.४५ च्या सुमारास वयाच्या ६६ व्या वर्षी...