Sunday, September 15, 2024
Homeनगरपालकमंत्री विखे पाटील यांचा आ. थोरात यांना खोचक सल्ला म्हणाले..

पालकमंत्री विखे पाटील यांचा आ. थोरात यांना खोचक सल्ला म्हणाले..

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस पक्षासाठी अहमदनगर जिल्ह्यात एकही जागा आणता आली नाही. त्यांनी दुसर्‍यांची तळी उचलण्यात धन्यता मानली. यामुळे आता स्वत:च्या अस्तित्वाची चिंता करा, असा खोचक सल्ला महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. थोरात यांना दिला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्याच्या निर्धार देशातील जनतेने केला होता. मतदानानंतर आलेल्या कल चाचण्यातून यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे मत मंत्री ना. विखे पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी माध्यमांशी बोलतांनामंत्री विखे पाटील म्हणाले, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त करून लोकांनी विकास प्रक्रीयेला साथ दिली असल्याचे त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विकास प्रक्रीयेला देशातील मतदारांनी पाठबळ दिले. अहमदनगर मतदारसंघातही जनतेन विकासालाच प्राधान्य दिले. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजय होणार हा विश्वास आमचा कायम असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

टंचाईबाबत प्रशासनाला सुचना
आचारसंहीता अद्याप शिथिल झाली नसली तरी टंचाईच्या बाबतीत सर्व सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पाणी आणि चारा यांची टंचाई कुठेही भेडसावणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

सुप्यातील कारवाई सूडबुध्दीने नव्हे
सुपा येथील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत कोणतीही राजकीय सूडबुध्दी नाही. प्रशासनाने ही कारवाई केली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणची अतिक्रमणे सगळीकडेच काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे गुन्हेगारीला पाठबळ मिळत होते. पण ज्यांनी आशा भाडोत्री लोकांमार्फत आपला धंदा सुरू ठेवला आहे, त्यांना वाईट वाटणे साहजिक असल्याचा टोला त्यांनी आरोप करणार्‍यांना लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या