Monday, March 31, 2025
Homeनगरदूध उत्पादकांना हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय करावा

दूध उत्पादकांना हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय करावा

केंद्रीय मंत्री अमित शहा यांना विखे पाटील यांची विनंती

लोणी |वार्ताहर| Loni

ऊस उत्पादक शेतकर्‍यांप्रमाणे दूध उत्पादक शेतकर्‍यांनाही हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली. ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. यावेळी ना. विखे पाटील यांनी आजपर्यंत महायुती सरकारने राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती ना. अमित शहा यांना दिली. दूध उत्पादक शेतकर्‍यांना हमी भाव मिळावा अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

दूध उत्पादन व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. दुधाला हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय केल्यास दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळेल, असे ना. विखे पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारने सद्य परिस्थितीत दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेता ना. विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दूध उत्पादक शेतकर्‍यांचे तसेच सहकारी व खासगी दूध संघाच्या प्रतिनिधींची बैठक घेवून दुधाला 30 रुपये स्थायीभाव व 5 रुपये शासकीय अनुदान असा 35 रुपये दर देण्याचा निर्णय घेत यापूर्वी तीन महिन्यांकरिता अनुदान दिले असल्याचे आवर्जून सांगितले.

दूध दरामध्ये होणारा चढ उतार लक्षात घेऊन हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकारने विचार करण्याबाबत ना. विखे पाटील यांनी केलेली विनंती मान्य करून दुधाच्या हमी भावाबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास केंद्र सरकार निश्चित याबाबत सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi News : शिर्डी विमानतळावरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडीगची गुढी

0
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन रविवारी 30 मार्चपासून नाईट लँडीग सुरू झाली असून हैदराबादवरुन इंडीगो एअरलाईनचे विमान 56...