अस्तगाव |वार्ताहर| Astgav
राहाता तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या मुदत संपल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी हे आदेश काढले आहेत.
ऑगस्टमध्ये संपणार्या 11 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. गटविकास अधिकारी शेवाळे यांनी या ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 35 चे तरतुदीनुसार या नेमणुका 28 ऑगस्ट पासून केल्या आहेत.
ग्रामपंचायती व प्रशासक असे- भगवतीपूर- एस. बी. कुर्हे (कृषी अधिकारी पं. स.), बाभळेश्वर- पी. एस. चोपडे (विस्तार अधिकारी कृषी पं.स.), कोल्हार बु॥- बी. के. घिगे- (विस्तार अधिकारी सां. पं. स.), लोणी बु॥- एस. बी. गायकवाड (विस्तार अधिकारी (पंचायत) पं. स.), लोणी खु॥-एस. बी. गायकवाड (विस्तार अधिकारी (पंचायत) पं. स.), ममदापूर – ए. एस. सोनवणे (शाखा अभियंता (ग्रा. पा. पू.) उपविभाग राहाता),
गोगलगाव- ई. एस. गिते (शाखा अभियंता (जि. प. सां. बा.) उपविभाग राहाता), हनुमंतगाव- वाकचौरे डी. डी. (विस्तार अधिकारी (शिक्षण) पं. स. राहाता), नांदूर- एस. एस. घोरपडे (शाखा अभियंता (जि. प. सां. बा.) उपविभाग राहाता), पाथरे बुद्रुक- एस. बी. कुर्हे (कृषी अधिकारी पं. स. राहाता), तिसगाव- श्रीमती जे. बी. जाधव (विस्तार अधिकारी (कृषी) पं. स. राहाता)
ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर या नेमणुका आपसुकच रद्द होतील. सप्टेंबर महिन्यातही काही ग्रामपंचायतींच्या मुदती संपत असल्याने त्यावरही प्रशासक येणार आहेत. त्यात आडगाव, अस्तगाव, जळगाव, एकरुखे, केलवड, पिंपळवाडी, पिंपरी लोकई, रामपूरवाडी, रांजणगाव, सावळीविहीर खुुर्द, शिंगवे, वाळकी या गावांचा समावेश राहिल.