Sunday, June 14, 2026
Homeक्राईमAhilyanagar : राहाता, शिर्डीतील गुन्ह्यांचा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपवला

Ahilyanagar : राहाता, शिर्डीतील गुन्ह्यांचा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपवला

एसपी घार्गे यांचे आदेश || ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट घोटाळा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एका वर्षात पैसे दुप्पट आणि मासिक परताव्यावर चकाचक कमाईचे आमिष दाखवत ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ या बनावट आर्थिक कंपनीने राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीविरोधात शिर्डी आणि राहाता पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

पैसे दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवून या कंपनीने अनेक सामान्य गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढले. शितल गोरखनाथ पवार (वय 33, रा. पैजनबाबाचा मळा, राहाता) यांनी 4 जुलै रोजी राहाता पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, भूपेंद्र राजाराम सावळे, भाऊसाहेब आनंदराव थोरात, संदीप सावळे, सुबोध सावळे व राजाराम भटू सावळे (सर्व रा. शिर्डी) या मुख्य संशयित आरोपींनी त्यांना आठ लाखांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. प्रारंभी काही महिने परतावा दिल्यानंतर अचानक पैसे देणे थांबवले आणि पवार यांची फसवणूक झाली.

याच प्रकारची तक्रार शिर्डी येथील अनिल रामकृष्ण आहेर यांनी केली असून त्यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात 21 गुंतवणूकदारांची एकूण 1 कोटी 65 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात पुन्हा भूपेंद्र सावळे यासह राजाराम सावळे, संदीप सावळे, भाऊसाहेब थोरात, पुंजा पोटीडे, सुबोध सावळे व अरूण नंदन यांचाही समावेश आहे.

या आर्थिक घोटाळ्याचा झपाट्याने वाढणारा परीघ पाहता, सुमारे एक हजार पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी एकूण 300 ते 350 कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या गुंतवणूकदारांमध्ये शिर्डी येथील साईबाबा संस्थानमधील काही कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या आदेशानुसार, या दोन्ही गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करीत असून, गुंतवणूकदारांचे आर्थिक नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीनेही काही ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत.

महाराष्ट्रभर जाळं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्रभर पसरली आहे. यासंदर्भात नाशिक, शहादा (जि. नंदूरबार) येथील पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हे दाखल झाले आहेत. शहादा पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे याला अटक केली आहे. मात्र, त्याच्यासह इतर संशयित आरोपी अजूनही तपासाच्या कक्षेबाहेर आहेत. आता राहाता व शिर्डी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीचा ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरती भर; तर मविआत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) आकडे पाहिले तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra...