Sunday, September 20, 2026
Homeनगरआजारपणाचा फायदा घेऊन धर्मांतराचा प्रयत्न; तथाकथित 'फादर'वर गुन्हा दाखल

आजारपणाचा फायदा घेऊन धर्मांतराचा प्रयत्न; तथाकथित ‘फादर’वर गुन्हा दाखल

राहाता (वार्ताहर)

आजारपण आणि कौटुंबिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन एका पीडित महिलेसह तिच्या भावाला बळजबरीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा धक्कादायक प्रकार राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे समोर आला आहे. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात एका संशयित व्यक्तीविरुद्ध जादुटोणा प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पीडित २१ वर्षीय महिलेचे काही महिन्यांपूर्वी बाळ पोटातच दगावल्यामुळे तिची तब्येत सातत्याने खालावलेली होती. ऑगस्ट २०२६ मध्ये एका नातेवाईकाने पढेगाव येथील एका कथित ‘फादर ‘बाबत माहिती देऊन प्रार्थनेने तब्येत बरी होईल, असे सांगितले. त्यानुसार २९ ऑगस्टपासून एका व्यक्तीने महिलेला फोन करून प्रार्थना आणि मंत्रोपच्चार सुरू केले.

१५ सप्टेंबर रोजी तुमच्या घरात करणीबाधा झाली आहे, असे सांगत संशयिताने १६ सप्टेंबर रोजी पीडितेच्या माहेरी धाड टाकली. तिथे त्याने बायबलचे पुस्तक काढून मोठ्याने मंत्र पठण सुरू केले आणि पीडितेच्या लहान भावाच्या हातातील धार्मिक धागा तोडण्याचा प्रयत्न केला. करणीबाधा दूर करण्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारावाच लागेल, असा थेट दबाव त्याने कुटुंबावर टाकला.

घरातील आरडाओरड ऐकून शेजारी जमा झाले. गावकऱ्यांनी संशयावरून त्या तथाकथित फादरची ओळख पटवण्यासाठी त्याचे ओळखपत्र तपासले असता धक्कादायक प्रकार समोर आला. ती व्यक्ती ख्रिश्चन नसून हिंदू मराठा समाजातील आहे. स्वतः धर्म बदलून तो लोकांना ‘फादर’ असल्याचे भासवून फसवणूक करत होता.

स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने पीडितेला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पीडितेच्या तक्रारीवरून राहाता पोलिसांनी संशयिताविरुद्ध जादु‌टोणा विरोधी कायदा २०१३ (कलम ३(१), ३(२)) आणि महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ (कलम ९(१), ९(२)) अन्वये एफआयआर क्र. ०३८३/२०२६ नोंदवला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Manisha Jejurkar Suicide Case : डाॅ. नीलेश जेजुरकरला चार दिवसांची पोलीस कोठडी;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik गंगापूर रोड येथील डॉ. मनीषा जेजुरकर (Dr Manisha Jejurkar) यांच्या आत्महत्या प्रकरणात (Suicide Case) तब्बल १९३ दिवसांनंतर नाशिक जिल्हा शासकीय...