Saturday, July 27, 2024
Homeनगरराहात्यात जुगार अड्ड्यावर छापा; 15 जुगारी ताब्यात

राहात्यात जुगार अड्ड्यावर छापा; 15 जुगारी ताब्यात

राहाता |वार्ताहर| Rahata

राहाता येथील आंबेडकरनगर परिसरात शनिवारी रात्री 9 वाजे दरम्यान पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत 15 जुगारींना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेला 7 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, गुप्त बातमीदारमार्फत राहाता येथील आंबेडकरनगर येथे पत्र्याच्या मोकळ्या शेडखाली काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत अशी खात्रीशीर माहिती पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाल्याने त्यांनी पोलिस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आरोपी दिलीप बाबुराव निकाळे (वय 40) रा.आंबेडकरनगर राहाता, राहुल विजय कोपरे (वय 29) रा. आंबेडकरनगर ता.राहाता, नामदेव बाबुराव बिरे (वय 44) रा. साकुरी ता.राहाता, हरिभाऊ निवृत्ती घोडेकर (वय 66) रा. एकरूखे ता. राहाता, महेश सोमनाथ पालांडे (वय 25) रा.आंबेडकरनगर ता. राहाता, दत्तू जालिंदर थोरात (वय 34) रा. अण्णाभाऊ साठेनगर ता. राहाता, मनोज सुनील आहेर (वय 23) रा. राजवाडा ता. राहाता, राजू चिमाजी गायकवाड (वय 28) रा. साकुरी ता. राहता आकाश अरुण शिरसाठ (वय 34) रा. आंबेडकरनगर ता. राहाता , प्रमोद शिवाजी पवार (वय 35) रा.शिर्डी ता. राहाता , बंडू पुंडलिक आहिरे (वय 55) रा. शिर्डी ता. राहाता , राजेंद्र आगस्तीन वाघमारे (वय 50) रा. पिंपळस ता. राहाता, संजय प्रल्हाद घोडके (वय 39) रा. 16 चारी ता.राहाता ,अश्फाक सिकंदर शेख (वय 58) रा.अस्तगाव ता. राहाता, पेत्रस सगन त्रिभुवन (वय 65) रा. अस्तगाव ता. राहाता यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या सर्व आरोपींविरुध्द राहाता पोलीस स्टेशन येथे पो.कॉ शाम सोपानराव जाधव यांचे फिर्यादीवरून मुंबई जुगार कायदा कलम 12( अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पो.हे.कॉ इरफान शेख, पो.हे.कॉ आप्पासाहेब थोरमिसे, पो.ना. अशोक शिंदे,पो.ना. कृष्णा कुर्‍हे, पो कॉ शाम जाधव, पो.कॉ. दिनेश कांबळे आदींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या