Saturday, May 2, 2026
HomeनगरRahata : राहात्यात सिंहाच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Rahata : राहात्यात सिंहाच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

राहाता |वार्ताहर| Rahata

शहरातील सदाफळ वस्तीवर सिंह (Lion) दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहाता तालुक्यात (Rahata) बिबट्याने (Leopard) अनेक मुले व प्राण्यांचे बळी घेतले आहेत. तसेच प्राणघातक हल्ले करून मोठी दहशत निर्माण केली आहे. आता शहरात सिंहाचा वावर वाढल्याने बिबट्या (Leopard) आणि सिंह (Lion) यांच्या दुहेरी दहशतीमुळे शेतकरी, शेतमजूर व नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. वनविभागाने तातडीने संबंधित ठिकाणी पिंजरा (Cage) लावून सिंह व बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही नागरिकांनी व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर तेथे सिंहच असल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यासह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बिबटे मोठा धुमाकूळ घालत आहेत. दररोज कुठे ना कुठे पशुधनावर डल्ला मारत आहेत, तर कुठे नागरिकांवर हल्ले करत आहेत. यापूर्वी अनेक चिमुकल्यांना बिबट्याने (Leopard) आपली शिकार बनवले आहे. आता सिंहाची (Lion) भर पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सदाफळ वस्ती, मावलाया रोड या भागात एका रस्त्यावर बसलेल्या अवस्थेत काही मजुरांना सिंह दिसला. त्यांनी तो प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला, असे बोलले जाते.

खरोखर तो सिंह होता की नाही, याची पडताळणी वन विभागाने गांभीर्याने घेऊन संबंधित प्राण्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे. मात्र बिबट्या पाठोपाठ आता सिंहाचे दर्शन होऊ लागल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. शेतकरी व शेतमजूर आपल्या शेतात जाताना जीव मुठीत धरून जात आहेत. बिबट्या व सिंहाच्या दहशतीखाली नागरिक जीवन जगत आहेत. सिंह (Lion) या भागात कुठून आणि कसा आला, हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने भेडसावत आहे. नागरिकांनी वन विभागाने (Forest Department) याबाबत सत्यता सांगितल्यानंतरच यावर विश्वास ठेवावा, अशी चर्चा सुद्धा सुज्ञ नागरिकांमध्ये आहे.

राहाता शहरात बिबट्या पाठोपाठ आता सिंहाचा वावर सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून सिंहाचा बंदोबस्त करावा.
– विजय सदाफळ, उपाध्यक्ष वीरभद्र देवस्थान

ताज्या बातम्या

Pune Bhor Crime News : नराधमाचा चिमुरडीवर अत्याचार; CM फडणवीसांची पहिली...

0
मुंबई | Mumbai पुणे जिल्ह्यातील (Pune District) भोर तालुक्याच्या (Bhor Taluka) नरसापूर परिसरात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार (Rape) करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Murder)...