राहाता (प्रतिनिधी)
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचा आणि जागतिक इंचन टंचाईचा थेट फटका आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घराला बसू लागला आहे. मात्र अशा भीषण संकटाच्या काळातही राहाता तालुक्यात ‘इंडेन’ गॅस एजन्सीकडून माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला असून घरगुती वापराचे सिलेंडर चक्क खासगी कार्यक्रम आणि व्यावसायिक संस्थांना चढ्या दराने पुरवले जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एकीकडे सामान्य ग्राहक सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभा असताना दुसरीकडे एजन्सीच्या मेहेरबानीने शेकडो सिलेंडर हॉटेल आणि लग्न सोहळ्यात जळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना पहाटेपासून एजन्सीबाहेर लांबच लांच रांगा लावाव्या लागत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विस्कळीत झाल्याचे तुणतुणे वाजवून सर्वसामान्य ग्राहकांना रिकाम्या हाती परत पाठवले जात आहे. मात्र हेच चित्र तालुक्यात फिरल्यावर पूर्णपणे वेगळे दिसते. तालुक्यातील अनेक हॉटेल्स, चहा टपन्या आणि रेस्टॉरंट्समध्ये घरगुती वापराच्या टाक्यांचा अवैध वापर राजरोसपणे सुरू आहे. नियमानुसार व्यावसायिक वापरासाठी महागडे सिलेंडर वापरणे बंधनकारक असताना, गरिबांच्या हक्काचे सबसिडीचे स्वस्त सिलेंडर या धनदांडग्या व्यावसायिकांकडे पोहोचतातच कसे? हा सर्वांत मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राहाता तालुक्यातील काही खासगी कार्यक्रमांसाठी आणि लझ सोहळ्यांसाठी घरगुती गॅस टाक्यांची मोठी रसद पुरवली जात आहे. सामान्य ग्राहकाला एक सिलेंडर मिळवण्यासाठी वणवण करावी लागत असताना एजन्सीच्या ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळे हे सिलेंडर काळ्या बाजारात वळवले जात आहेत. हे केवळ बेकायदेशीरच नाही तर टंचाईच्या काळात जनतेच्या अन्नावर डल्ला मारण्याचा संतापजनक प्रकार आहे, या सर्व प्रकारात तालुका पुरवठा विभागाची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि संतापजनक आहे. सामान्य जनतेला हक्काचा गॅस मिळवण्यासाठी रेशनिंगप्रमाणे रांगेत उभे राहावे लागत असताना दुसरीकडे दोन हजार रुपये घेऊन काळचा बाजारात घरगुती सिलेंडर्सची खिरापत वाटली जात आहे.
डोळ्यादेखत हटिल्स आणि मंगल कार्यालयात घरगुती सिलेंडरचा बापर होत असताना, पुरवठा विभाग निद्रावस्थेत का आहे? की या काळ्या बाजारात पुरवठा विभागाचेही हात ओले झाले आहेत? असे प्रश्न आता जनतेतून विचारले जात आहेत. गॅसची नळी बदलण्याच्या नावाखाली ग्राहकांची लूट करायची आणि हक्काचा गॅस व्यापाऱ्यांना विकायचा, असा दुहेरी छळ इंडेन गॅस एजन्सीकडून सुरू आहे. पुरवठा विभागाने तातडीने या ठिकाणाची तपासणी करून सिलेंडर जप्त करावेत आणि संबंधित एजन्सीचा परवाना रद्द करावा, अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, अला इशारा आता नागरिक देत आहेत.
दैनिक सार्वमतने तालुक्यात ठिकठिकाणी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. तालुक्यातील नामांकित हॉटेल्स, यहा टपन्या, नाष्टा सेंटर्स आणि मोठ्या खासगी कार्यक्रमांच्या ठिकाणी घरगुती वापराच्या निळ्या ऐवजी लाल टाक्यांचा वापर राजरोसपणे सूरु आहे. व्यावसायिक वापरासाठी महागडे सिलेंडर वापरणे कायद्याने बंधनकारक असताना एजन्सीच्या संगनमताने सबसिडीचे स्वस्त सिलेंडर या व्यावसायिकांच्या चुलीत जळत असल्याचे कॅमेन्यात कैद झाले आहे.





