Saturday, May 25, 2024
Homeनगरराहाता भूमिअभिलेख कार्यालयात सामान्य नागरिकांची ससेहोलपट

राहाता भूमिअभिलेख कार्यालयात सामान्य नागरिकांची ससेहोलपट

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत.

- Advertisement -

या कार्यालयातून शेतकरी तसेच नागरिकांना आपल्या जमिनीचे उतारे, नकाशे वेळेवर दिले जात नाहीत. या कार्यालयामध्ये गेल्यावर तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. आज नाही उद्या या, परवा या, असे सांगून तेथून नागरिकांना रवाना केले जाते.

काही शेतकर्‍यांनी आपल्या शेतजमिनीची मोजणी करून सहा महीने उलटून गेले तरी त्यांना आपल्या जमिनीचे मोजणी नकाशे अद्याप मिळालेले नाहीत.

काही शेतकर्‍यांची मोजणी प्रकरणेच कार्यालयामधून गायब असल्याचे काहींचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यालयामधील एक कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला होता. त्यानंतर अजून दोन कर्मचार्‍यांची या कार्यालय ामधून बदली झाली. त्यामुळे अपुर्‍या मनुष्यबळाअभावी या कार्यालयामधील सर्व कामकाज ठप्प झालेले आहे. यामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या कार्यालयाचा कारभार सुरळीत करावा व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

पिंपळस येथील शेजमिनीची मोजणी मागील सहा महिन्यांपूर्वी झालेली असून सदरील मोजणी नकाशा घेणे कामी मी कार्यालयामध्ये सतत चकरा मारत असून अद्याप मला माझा शेतजमिनीचा नकाशा मिळाला नाही. याबाबत मी स्वतः तिथे चौकशी केली असता माझे मोजणीचे प्रकरण सदरील कार्यालयामधून गहाळ झाले असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे.

एक शेतकरी पिंपळस

- Advertisment -

ताज्या बातम्या