Saturday, May 4, 2024
Homeनगरपिंपरी निर्मळमध्ये लम्पीचा शिरकाव, पशुधन विभाग अनभिज्ञ

पिंपरी निर्मळमध्ये लम्पीचा शिरकाव, पशुधन विभाग अनभिज्ञ

पिंपरी निर्मळ | वार्ताहर

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील जवळपास चार गाईंना लम्पीचा प्रर्दुभाव झाला आहे. मात्र याबाबद शासनाचा पशुधन विभाग अनभिज्ञ असुन शेतकऱ्यांना पदरमोड करून उपचार करावे लागत असल्याने पशुपालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

गणेश परीसरातील पिंपरी निर्मळ परीसर निळवंडेच्या जिरायत टापुतील गाव असल्याने दुग्ध व्यवसायावरच प्रपंच उभे आहेत. देशासह राज्यात लम्पीने थैमान घातले आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आजारावर औषधोउपचार शासन करणार असल्याची घोषणा केली असुन त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.

मात्र पिंपरी निर्मळ येथे चार गाईंना लम्पीने गाठले आहे. शासनाच्या पशुसंर्वधन विभागाने औषध उपचारांसाठी मदत तर सोडाच पण एकाही अधिकाऱ्याने गावाकडे येवुन या आजारी पशुधनाची पाहणी देखील केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पदरमोड करून पशुधनावर उपचार करावे लागत आहेत.

येथील राहुल निर्मळ तसेच लक्ष्मण निर्मळ यांच्या गाई लम्पीने आजारी असुन शासनाच्या पशुधन विभागाने ही बाब जबाबदारीने न घेतल्यास गावात हा आजार पसरण्याची शक्यता असुन शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. पशुधन विभागाने तातडीने गावात भेटी देवुन आवश्यक उपचार करावेत अशी मागणी पशुपालकांमधुन होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या