Sunday, March 30, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत शेवगा 10500 तर गवार 9000 रुपये प्रतिक्विंटल

राहाता बाजार समितीत शेवगा 10500 तर गवार 9000 रुपये प्रतिक्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी भाजीपाल्याची चांगली आवक झाली. शेवगा सरासरी 10500 रुपये, गवार 9000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

लिंबू 3000 ते 4000 रुपये, सरासरी 3500 रुपये, आद्रक 3500 ते 10000 रुपये तर सरासरी 6700 रुपये, बटाटा सरासरी 1700 रुपये, भेंडी किमान 2000 रुपये, जास्तीत जास्त 3000 रुपये, तर सरासरी 3500 रुपये. दूधी भोपळा 500 ते 1500 रुपये, सरासरी 1000 रुपये. फ्लॉवर 500 ते 2500 रुपये, सरासरी 1500 रुपये. गाजर 1500 ते 2000 रुपये तर सरासरी 2500 रुपये, गवार 7000 ते 7500 रुपये तर सरासरी 7200 रुपये. काकडी 2000 ते 2500 रुपये, सरासरी 2200 रुपये. कारली 1000 ते 1500 सरासरी 1200 रुपये.

कोबी 500 ते 1000 रुपये तर सरासरी 800 रुपये. लसूण 10000 ते 13000 रुपये, सरासरी 11500 रुपये, ढोबळी मिरची 2000 ते 3000 रुपये, सरासरी 2500 रुपये. घोसाळी भाजी सरासरी 2000 रुपये. दोडका (शिराळी) 2000 ते 3000 रुपये तर सरासरी 2500 रुपये. टोमॅटो 500 ते 1200 रुपये, सरासरी 900 रुपये. वांगी 1000 ते 5000 रुपये, सरासरी 3000 रुपये. मिरची हिरवी 2000 ते 3000 रुपये, सरासरी 2500 रुपये. पिकेडोर 2000 ते 3500 रुपये, तर सरासरी 2700 रुपये.

कढिपत्ता सरासरी 15 रुपये. कोथिंबीर नग किमान 8 रुपये, जास्तीत जास्त 25 रुपये तर सरासरी 16 रुपये. कांदा पात सरासरी 15 रुपये. मेथी भाजी 10 ते 25 रुपये सरासरी 17 रुपये. पालक 8 ते 10 तर सरासरी 9 रुपये. शेपु सरासरी 15 रुपये असा भाव मिळाला. सोयाबीनची 13 क्विंटल सोयाबीन ची आवक झाली. सोयाबीनला किमान 4500 रुपये, जास्तीत जास्त 4800 रुपये तर सरासरी 4750 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2625 रुपये भाव मिळाला. हरभरा (डंकी) सरासरी 4500 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचीव उध्दव देवकर यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अभूतपूर्व प्रतिसादात ‘देशदूत पंचवटी अनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो’ची सांगता

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik पंचवटीच्या नवीन आडगाव नाका, जत्रा चौफुली, रासबिहारी रोड, कोणार्क नगर, बळी मंदिर, छत्रपती संभाजी नगर नाका परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन...