राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2800 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. मंगळवारी राहाता बाजार समितीत कांद्याच्या 4955 गोण्यांची ची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2200 ते 2800 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1400 ते 2150 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 800 ते 1350 रुपये, गोल्टी कांदा 1700 ते 2100 रुपये. जोड कांद्याला 350 रुपये ते 700 रुपये भाव मिळाला.
संत्रीच्या (Orange) 25 कॅरेटची आवक झाली. संत्रीला (Orange) 500 ते 2000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सरासरी 1250 रुपये भाव मिळाला. गव्हाच्या 17 क्विंटलची मंगळवारी आवक झाली. गव्हाला 2200 ते 2970 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 2650 रुपये भाव मिळाला. सोयाबीन (Soybeans) ची 2 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 3800 रुपये भाव मिळाला. ज्वारीची 2 क्विंटलची आवक झाली. ज्वारीला सरासरी 1951 रुपये भाव मिळाला.
हरभरा 17 क्विंटल ची आवक झाली. हरभर्याला (Gram) 5100 ते 5200 रुपये भाव मिळाला, तर सरासरी 5150 रुपये भाव मिळाला. तुरीला (Tur) 6090 रुपये भाव मिळाला. कोल्हार उपबाजार आवारात गव्हाची 30 क्विंटलची आवक झाली. गव्हाला किमान 2746 रुपये ते 3080 रुपये तर सरासरी 2915 रुपये भाव मिळाला.