राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. मंगळवारी राहाता बाजार समितीत कांद्याच्या 8594 गोण्यांची ची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1100 ते 1500 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 700 ते 1050 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 600 रुपये, गोल्टी कांदा (Onion) 700 ते 1100 रुपये. जोड कांद्याला 100 रुपये ते 300 रुपये भाव मिळाला.
- Advertisement -
मोसंबीच्या 16 कॅरेटची आवक झाली. मोसंबीला प्रतिकिलोला 12.50 ते 15 रुपये तर सरासरी 13 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 33 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंबाला (Pomegranate) प्रतिकिलोला 5 ते 85 रुपये तर सरासरी 65 रुपये भाव मिळाला.