राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल 1750 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 9479 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांदा नंबर 1 ला 1400 ते 1750 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1000 ते 1350 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) लिलाव नंबर 3 ला 500 ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 600 ते 1200 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 250 ते 500 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 9737 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला प्रतिकिलो 211 ते 305 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 121 ते 210 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 56 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 55 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 15 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 4100 रुपये ते 4300 रुपये, तर सरासरी 4200 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




