राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला प्रतिक्विंटल 2200 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 15940 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांदा नंबर 1 ला 1700 ते 2200 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1100 ते 1650 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) लिलाव नंबर 3 ला 500 ते 1050 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 700 ते 1300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 400 ते 800 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 7019 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलो 166 ते 255 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 111 ते 165 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 56 ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 55 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 7 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला सरासरी 4311 रुपये भाव मिळाला. भुईमुग शेंगाला 4196 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 5300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.





