Thursday, April 30, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीत लूज कांद्याला काय मिळतोय भाव?

Onion Price : राहाता बाजार समितीत लूज कांद्याला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी लूज कांद्याला (Onion) प्रति क्विंटल सर्वाधिक 1242 रुपये भाव मिळाला. प्रतवारीनुसार कांदा (Onion) नंबर 1 ला 851 ते 1242 रुपये, कांदा नंबर 2 ला 551 ते 850 रुपये, कांदा (Onion) नंबर 3 ला 200 ते 550 रुपये भाव मिळाले. डाळिंबाच्या (Pomegranate) 4420 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 141 ते 205 रुपये भाव, डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 140 रुपये भाव, डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 ते 90 रुपये भाव, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रति किलो भाव मिळाला.

- Advertisement -

ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit) 11 क्रेट्सची आवक झाली. ड्रॅगन फ्रुटला सरासरी 37 रुपये भाव मिळाला. पेरूची 150 कॅरेटची आवक झाली. पेरूला किमान 10 रुपये, ते 55 रुपये तर सरासरी 35 रुपये भाव मिळाला. सीताफळाची 597 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला 15 ते 60 रुपये तर सरासरी 50 रुपये भाव मिळाला. गव्हाची 4 क्विंटलची आवक झाली. गव्हाला 2735 ते 2781 रुपये भाव मिळाला, तर सरासरी 2760 रुपये.

सोयाबीनची (Soybeans) 60 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) 3500 ते 3910 रुपये तर सरासरी 3750 रुपये भाव मिळाला. बाजरीला सरासरी 1800 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात ‘रोहित’ पाहुण्यांचे दिमाखदार आगमन

0
नाशिक | जिमाका वृत्तसंस्था Nashik निसर्गाच्या किमयेचा एक अद्भुत अविष्कार सध्या नाशिक जिल्ह्याचे भूषण असलेल्या आणि महाराष्ट्राची शान असलेल्या नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पाहायला मिळत आहे. एप्रिलच्या...