Tuesday, May 6, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत कांदा व डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांदा व डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त 1400 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 4271 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एक ला 1100 ते 1400 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर दोन ला 700 ते 1050 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 600 ते 900 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 250 ते 500 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 252 क्रेटसची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर एक ला 66 ते 95 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर दोनला 41 ते 65 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 21 ते 40 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर चार ला 5 ते 20 रुपये भाव मिळाला.

खरबूजाची 11 क्रेट्स ची आवक झाली. खरबूजला 5 रुपये ते 17.50 रुपये तर सरासरी 16 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. गव्हाच्या 4 क्विंटल ची आवक झाली. गव्हाला सरासरी 2733 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4101 रुपये भाव प्रतिक्विंटला मिळाला. ज्वारीला सरासरी 1971 रुपये प्रतिक्विंटला भाव मिळाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ind Vs Pak War Mock Drill : नाशिकमध्ये मॉक ड्रिलसाठी हायअलर्ट

0
  नाशिक | प्रतिनिधी Nashik केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरातील २४४ सिव्हिल डिफेन्स जिल्ह्यांमध्ये (नागरिक सुरक्षा जिल्हे) मॉक ड्रिल होणार असून, महाराष्ट्रातील नाशिकसह ठाणे, पुणे, तारापूर (पालघर),...