Wednesday, February 4, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय 'हा' भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल ला 1800 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 8799 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांदा नंबर 1 ला 1500 ते 1800 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1000 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा लिलाव नंबर 3 ला 500 ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 900 ते 1200 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 300 ते 600 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

ड्रॅगन फ्रूटचे (Dragon Fruit) 21 कॅरेटची आवक झाली. ड्रॅगन फ्रूटला (Dragon Fruit) कमीत कमी प्रतिकिलोला 25 रुपये तर जास्तीत जास्त 60 रुपये, सरासरी 50 रुपये भाव मिळाला.

YouTube video player

पेरूच्या (Guava) 17 कॅरेटची आवक झाली. पेरूला (Guava) किमान 20 रुपये, जास्तीत जास्त 30 रुपये तर सरासरी 25 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या 9338 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 231 ते 355 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 136 ते 230 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 61 ते 135 रुपये, डाळिंब नंबर (Pomegranate) 4 ला 10 ते 60 रुपये भाव मिळाल्याची माहिती ज्ञानेश्वर गोंदकर, सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...