Wednesday, July 29, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीत लूज कांद्याला काय मिळाला भाव?

Onion Price : राहाता बाजार समितीत लूज कांद्याला काय मिळाला भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी लूज कांद्याला (Onion) प्रति क्विंटल सर्वाधिक 1006 रुपये भाव मिळाला. प्रकारानुसार कांदा (Onion) नंबर 1 ला 751 ते 1006 रुपये, कांदा नंबर 2 ला 501 ते 750 रुपये, कांदा (Onion) नंबर 3 ला 151 ते 500 रुपये भाव मिळाले.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 2692 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 ते 225 रुपये भाव, डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 81 ते 130 रुपये भाव, डाळिंब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये भाव, डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 40 रुपये प्रति किलो भाव मिळाला. ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit) 17 कॅरेटची आवक झाली. ड्रॅगन फ्रुटला (Dragon Fruit) 20 ते 35 रुपये, तर सरासरी 25 रुपये भाव मिळाला.

पेरूची (Guava) 13 कॅरेट आवक झाली. पेरूला किमान 10 ते 25 रुपये, तर सरासरी 20 रुपये भाव मिळाला. सीताफळाची 488 कॅरेट आवक झाली. सीताफळाला 15 ते 60 रुपये, तर सरासरी 40 रुपये भाव मिळाला. अ‍ॅपल बोरची 11 कॅरेट आवक झाली. अँपल बोराला 20 ते 50 रुपये, तर सरासरी 35 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनची (Soybeans) 31 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) 3500 ते 4030 रुपये, तर सरासरी 3850 रुपये भाव मिळाला. गव्हाला 2500 ते 2611 रुपये तर सरासरी 2550 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Rahata : नगर-नाशिकवरील समन्यायीचे संकट टळले

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata यावर्षी विक्रमी वेळेत म्हणजे 28 जुलै 2026 रोजी रात्री उशिरा जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65 टक्के म्हणजे 50 टीएमसी झाला आहे.काल...