Wednesday, April 29, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत लूज कांद्याला काय मिळतोय भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत लूज कांद्याला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी लूज कांद्याला (Onion) प्रति क्विंटल सर्वाधिक 1000 रुपये भाव मिळाला. प्रकारानुसार कांदा (Onion) नंबर 1 ला 701 ते 1000 रुपये, कांदा नंबर 2 ला 401 ते 700 रुपये, कांदा (Onion) नंबर 3 ला 125 ते 400 रुपये भाव मिळाले.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 2213 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 181 ते 275 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 121 ते 180 रुपये भाव मिळाले. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 120 रुपये भाव मिळाले. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रति किलो भाव मिळाला.

ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit) 6 कॅरेटची आवक झाली. ड्रॅगन फ्रुटला (Dragon Fruit) किमान 25 रुपये, जास्तीत जास्त 48 रुपये आणि सरासरी 35 रुपये भाव मिळाला. बोराची 7 कॅरेट आवक झाली. बोराला सरासरी 33 रुपये भाव मिळाला. सीताफळाची 359 कॅरेट आवक झाली. सीताफळाला 3 ते 38 रुपये आणि सरासरी 20 रुपये भाव मिळाला. संत्रीला 3 ते 35 रुपये आणि सरासरी 19 रुपये भाव मिळाला.

गव्हाची 9 क्विंटलची आवक झाली. गव्हाला 2536 ते 2590 रुपये भाव मिळाले, तर सरासरी 2575 रुपये. सोयाबीनची (Soybeans) 59 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) 3800 ते 4160 रुपये आणि सरासरी 4075 रुपये भाव मिळाला. बाजरीला सरासरी 1800 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 1860 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik News : जनगणना प्रात्यक्षिकानिमित्त दिंडोरीत कर्मचारी घरोघरी

0
दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori जनगणनेचे प्रात्यक्षिक (Census Demonstration) करण्यासाठी कर्मचारी दिंडोरी शहरातील घरोघरी जात असून प्रात्यक्षिकांमुळे दिंडोरी शहरात (Didnori City) सुध्दा जनगणनेविषयी औत्सुक्य...