राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी गोणीतील कांद्याला 1700 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 6190 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1500 रुपये ते 2000 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1000 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 500 रुपये ते 1100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 200 रुपये ते 450 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 69 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 111 रुपये ते 155 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 71 रुपये ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 रुपये ते 70 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 40 रुपये भाव मिळाला. सीताफळाच्या 159 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला 10 ते 27 रुपये तर सरासरी 15 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.





