Thursday, May 15, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 6000 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 4775 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला किमान प्रतीक्विंटलला 4700 रुपये तर जास्तीत जास्त 6000 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 3700 रुपये ते 4650 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 2100 रुपये ते 3750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 2200 ते 3650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 3800 ते 4200 रुपये, जोड कांद्याला 1000 ते 1500 रुपये असा भाव मिळाला.

डाळिंबाच्या (Pomegranate) 124 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 61 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 41 रुपये ते 60 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 21 ते 40 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 5 ते 20 रुपये भाव मिळाला. सीताफळाच्या 448 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 500 रुपये, जास्तीत जास्त 5500 रुपये तर सरासरी 4000 रुपये. पेरूच्या (Guava) 108 क्रेट्स ची आवक झाली. पेरू (Guava) 1500 ते 2000 रुपये, तर सरासरी 1700 रुपये प्रतीक्विंटलला भाव मिळाला.

संत्रीच्या 21 क्रेट्स ची आवक झाली. संत्रीला ला 1000 ते 2000 रुपये, तर सरासरी 1500 रुपये प्रतीक्विंटलला भाव मिळाला. मोसंबी 5 ते 15 रुपये तर सरासरी 10 रुपये. ड्रेगन फ्रुटला (Dragon Fruit) 20 ते 110 रुपये तर सरासरी 80 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rajnath Singh : “धर्म विचारून त्यांनी निरपराधांचा बळी घेतला, आपण कर्म...

0
नवी दिल्ली | New Delhi  जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील...