राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 3500 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 225 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 9573 गोण्यांची ची आवक झाली. कांदा नंबर एकला 2500 ते 3500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 1500 ते 2450 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 600 ते 1450 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 600 ते 2200 रुपये. जोड कांदा 500 ते 1400 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 3368 क्रेटस्ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 171 ते 225 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 रुपये ते 170 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




