Monday, October 5, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत कांदा व डाळिंबाला काय मिळतोय भाव

Rahata : राहाता बाजार समितीत कांदा व डाळिंबाला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 3200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 225 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) 9686 गोण्यांची ची आवक झाली. कांदा नंबर एकला 2300 ते 3200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1400 ते 2250 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1350 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 1900 रुपये. जोड कांदा (Onion) 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

बाजार समितीत मंगळवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 7048 क्रेटस्ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 171 ते 225 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 101 रुपये ते 170 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटची (Dragon Fruit) 6 क्रेटस् ची आवक झाली. ड्रॅगन फ्रूटला प्रतिकिलोला 37 ते 75 रुपये तर सरासरी 45 रुपये भाव मिळाला. पेरू ची 14 क्रेटस्ची आवक झाली. पेरुला 7 ते 40 रुपये तर सरासरी 30 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : विखे-शिंदे-थोरात एकत्र बसणार!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तर महाविकास आघाडीकडून माजीमंत्री बाळासाहेब थोरात...