Wednesday, September 9, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याची आवक वाढली. कांद्याला (Onion) प्रतिक्विंटल सर्वाधिक 3200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 225 रुपये भाव मिळाला. कांद्याची 7992 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 2300 ते 3200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1300 ते 2250 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1250 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 1900 रुपये. जोड कांदा (Onion) 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या 6839 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 171 ते 225 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 101 रुपये ते 170 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला. सीताफळाची 28 कॅरेट आवक झाली. सीताफळाला 55 ते 100 रुपये तर सरासरी 75 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

चौकशीसाठी आलेल्या पथकासमोरच प्राध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon येथील मुनिसिपल हायस्कूल व जूनियर कॉलेजमध्ये आज चौकशीसाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यां समोर एका प्राध्यापकास सततच्या चौकशीचे मानसिक तणावाने कार्यालयातच...