Tuesday, May 5, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला 2100 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 13308 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1500 ते 2100 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1000 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 रुपये ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 800 रुपये ते 1300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 350 ते 700 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळींबाच्या (Pomegranate) 4202 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 151 ते 225 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 106 रुपये ते 150 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 46 ते 105 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

गव्हाच्या 22 क्विंटलची आवक झाली. गव्हाला किमान 2251 रुपये, जास्तीत जास्त 2650 रुपये तर सरासरी 2600 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 10 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 4250 रुपये, जास्तीत जास्त 4350 रुपये, तर सरासरी 4300 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) सरासरी 5201 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग...