राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल 2000 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 11523 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांदा नंबर 1 ला 1500 ते 2000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1000 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) लिलाव नंबर 3 ला 500 ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 700 ते 1250 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 300 ते 600 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 6661 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलो 181 ते 275 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 126 ते 180 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 ते 125 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2500 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 3 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला सरासरी 4221 रुपये भाव मिळाला.
हरभर्याला सरासरी 5480 रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटच्या (Dragon Fruit) 60 क्रेट्सची आवक झाली. ड्रॅगन फ्रूटला किमान 10 रुपये, जास्तीत जास्त 90 रुपये, तर सरासरी 70 रुपये भाव मिळाला, अशी माहिती सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




