Monday, September 14, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीत कांद्याला 'एवढा' भाव

Onion Price : राहाता बाजार समितीत कांद्याला ‘एवढा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त 1,700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 11,004 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटल 1,300 ते 1,700 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 900 ते 1,250 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) लिलाव नंबर 3 ला 400 ते 850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 500 ते 1,100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 250 ते 500 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 7,315 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला प्रति किलो 171 ते 275 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 96 ते 170 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 46 ते 95 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

गव्हाला किमान 2,671 रुपये, जास्तीत जास्त 2,701 रुपये, तर सरासरी 2,685 रुपये मिळाले. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4,670 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटच्या (Dragon Fruit) 377 क्रेट्सची आवक झाली. ड्रॅगन फ्रूटला (Dragon Fruit) प्रति किलो किमान 15 रुपये ते 49.25 रुपये, तर सरासरी 45 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गणरायाच्या आगमनासाठी अहिल्यानगर सज्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मंगलमूर्ती श्री गणरायाच्या आगमनाची अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात जय्यत तयारी पूर्ण झाली असून, आज, सोमवारी घराघरांत आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना...