राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त 1450 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 5533 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1100 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 700 ते 1050 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 650 रुपये, गोल्टी कांदा 600 ते 900 रुपये. जोड कांद्याला (Onion) 200 रुपये ते 400 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या 647 क्रेटस आवक झाली. डाळिंब नंबर (Pomegranate) 1 ला 101 ते 175 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 61 ते 100 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 41 ते 60 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.ज्वारीला सरासरी 1900 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) किमान 5400 रुपये, जास्तीत जास्त 5460 रुपये तर सरासरी 5430 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2774 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) 4255 ते 4286 रुपये तर सरासरी 4270 रुपये भाव मिळाला.