Monday, May 27, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याला 2000 रुपये भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला 2000 रुपये भाव

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 8698 गोणी कांदा आवक (Onion Inward) झाली. कांद्याला (onion) 2 हजार रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

काल बाजार समितीत कांद्याच्या (onion) 8 हजार 698 गोण्या दाखल झाल्या होत्या. त्यात एक नंबर कांद्याला (Onion) प्रतिक्विंटल 1500 ते 2000 रुपये असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 950 ते 1450 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 900 असा भाव प्रतिक्विंटलला मिळाला. तर गोल्टी कांदा 1300 ते 1500 व जोड कांदा 100 ते 500 असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

डाळिंबाच्या (Pomegranate) 22603 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला 96 ते 125 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 71 ते 95 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 36 ते 70 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. तर डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 2.50 ते 35 रुपये असा भाव प्रतिकिलोला मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या