Thursday, May 7, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला 3500 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या एकूण 5540 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2500 ते 3500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1800 रुपये ते 2450 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 900 रुपये ते 1750 रुपये. गोल्टी कांदा (Onion) 2000 रुपये ते 2400 रुपये. जोड कांदा 400 ते 800 रुपये.

- Advertisement -

सिताफळाच्या 14 कॅरेटची आवक झाली. प्रतिक्विंटलला किमान 2000 ते 5500 रुपये तर सरासरी 3500 रुपये. मोसंबीच्या 57 क्रेटसची आवक झाली. मोसंबीला 1000 ते 1750 रुपये तर सरासरी 1250 रुपये भाव मिळाला. बोराच्या 9 क्रेटसची आवक झाली. बोराला सरासरी 1800 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळींबाच्या (Pomegranate) 37 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला किमान 26 रुपये तर जास्तीत जास्त 37 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला किमान 21 रुपये तर जास्तीत जास्त 25 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला किमान 11 ते जास्तीत जास्त 20 रूपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला किमान 5 रुपये तर जास्तीत जास्त 10 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Sangamner : हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ 70 लाखांचा गुटखा जप्त

0
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ मंगळवारी (दि. 5 मे) सकाळी सुमारे 11.30 वाजता स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर...