Saturday, May 4, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत कांदा 2500 तर सोयाबीन 6669 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा 2500 तर सोयाबीन 6669 रुपये क्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल बुधवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याची आवक झाली. कांद्याच्या 3641 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्ती जास्त 2500 तर लाल कांद्याला 2200 रुपये इतका भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6669 रुपये इतका भाव मिळाला.

- Advertisement -

राहाता बाजार समितीत 3 हजार 641 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2200 ते 2500 रुपये तर लाल कांद्याला 1800 ते 2200 असा भाव मिळाला. कांदा उन्हाळी नंबर 2 ला 1450 ते 2150 रुपये, लाल कांद्याला 1250 ते 1750 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 500 ते 1400 रुपये तर लाल कांद्याला 400 ते 1200 भाव मिळाला. गोल्टी उन्हाळी कांद्याला 1600 ते 1800 रुपये व लाल कांद्याला 1500 ते 1700 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 400 रुपये व लाल कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

डाळींबाच्या 171 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 91 ते 100 रुपये असा भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 61 ते 90 रुपये असा भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनची 29 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 6500 ते जास्तीत जास्त 6669 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 6585 असा भाव क्विंटलला मिळाला. हरबरा 4800, मकाला 1430 भाव मिळाला. बोराच्या 55 क्रेटस ची आवक झाली. बोरास 3 हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या