राहाता |प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) 4200 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 3867 गोण्यांची आवक झाली. कांदा नं. 1 कमीत कमी 3400 ते 4200 रुपये, कांदा नं. 2 कमीत कमी 2250 ते 3350, कांदा नं. 3 कमीत कमी 1500 ते 2200, गोल्टी कांदा 2800 ते 3200, जोड कांदा (Onion) 1100 ते 1500 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 5440 कॅरेटची आवक झाली. प्रतिकिलोला डाळिंब नंबर 1 ला 276 ते 405 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 166 रुपये ते 275 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 81 ते 165 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 20 ते 80 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. पेरूच्या 67 कॅरेटची आवक झाली. पेरूला कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 60 रुपये, सरासरी 45 रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रुटची 28 कॅरेट आवक झाली. कमीत कमी 50 ते 101 रुपये, सरासरी 90 रुपये भाव मिळाला.