Saturday, May 4, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत 10628 कांदा गोणी आवक

राहाता बाजार समितीत 10628 कांदा गोणी आवक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 10628 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली तर डाळिंबाच्या (Pomegranate)17520 क्रेटसची आवक (Inward) झाली. कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1600 ते 2200 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1050 ते 1550 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1000 रुपये इतका भाव मिळाला.

- Advertisement -

गोल्टी कांदा 1300 ते 1600 व जोड कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची (Pomegranate) 17520 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 91 ते 115 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 61 ते 90 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 30 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर (Uddhav Devak, Secretary, Market Committee) यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या