राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला 4600 रुपये प्रतीक्विंटलला भाव मिळाला. कांद्याच्या 3541 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 3550 ते 4600 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2500 रुपये ते 3500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 1800 रुपये ते 2450 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 3250 ते 3650 रुपये. जोड कांद्याला (Onion) 1200 ते 1600 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या 6950 क्रेट्स ची आवक झाली. प्रतिकिलोला डाळिंब नंबर 1 ला 201 ते 305 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 126 रुपये ते 200 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 66 ते 125 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 65 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. पेरूच्या 150 क्रेट्सची आवक झाली. पेरूला प्रतिकिलोला 25 ते 90 रुपये, सरासरी 70 रुपये भाव मिळाला. मोसंबीच्या 110 क्रेट्सची आवक झाली. मोसंबी ला 12 ते 25 रुपये, तर सरासरी 20 रुपये भाव मिळाला. ड्रेगन फ्रुट ला 65 ते 105 रुपये तर सरासरी 80 रुपये भाव मिळाला.