राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटल ला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता बाजार समितीत 4380 गोण्यांची ची आवक झाली. कांदा नंबर एकला 1000 ते 1400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर दोन ला 700 ते 950 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 300 ते 650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 400 ते 800 रुपये. जोड कांदा 100 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 10 गोण्यांना 1301 ते 1400 रुपये भाव मिळाला. 5 गोण्यांना 1201 ते 1300 रुपये भाव मिळाला. 509 गोण्यांना 1101 ते 1200 रुपये भाव मिळाला. 154 गोण्यांना 1001 ते 1100 रुपये भाव मिळाला. 1702 गोण्यांना 501 ते 1000 रुपये भाव मिळाला. 2000 गोण्यांना 100 ते 500 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 1424 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 171 रुपये ते 255 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 111 ते 170 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला. कैरीची 23 क्रेट्स ची आवक झाली. कैरीला प्रतिकिलीला किमान 7 रुपये, जास्तीत जास्त 17 रुपये तर सरासरी 15 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली




