राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला 1350 रुपये भाव मिळाला. रविवारी बाजार समितीत 3027 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1000 ते 1350 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 600 ते 950 रुपये भाव मिळाला.
- Advertisement -
कांदा नंबर 3 ला 300 ते 550 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 600 ते 900 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 200 ते 400 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 77 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 61 ते 100 रुपये. डाळींब नंबर 2 ला 36 ते 60 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 21 ते 35 रुपये. डाळींब नंबर 4 ला 5 ते 20 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.