राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
- Advertisement -
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त 1450 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 4544 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1200 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 800 ते 1150 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये, गोल्टी कांदा (Onion) 600 ते 1000 रुपये. जोड कांद्याला 250 रुपये ते 500 रुपये भाव मिळाला.
गव्हाला मंगळवारी 2500 रुपये सरासरी भाव मिळाला. मकाला सरासरी 2200 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 1850 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.