Sunday, May 26, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला (Onion) आज मंगळवारी 1800 रूपये भाव मिळाला. तर सोयाबीनला (Soybeans) 4766 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याच्या 25466 गोण्यांची आवक होत आहे. आज प्रतवारी नुसार कांद्या (Onion) नंबर 1 ला 1400 ते 1800 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 750 ते 1350 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 800 ते 1000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनला (Soybeans) किमान 4736 रुपये, जास्तीत जास्त 4766 रुपये तर सरासरी 4751 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2277 रुपये, जास्तीत जास्त 2409 रुपये तर सरासरी 2350 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) किमान 4710 रुपये, जास्तीत जास्त 4781 रुपये तर सरासरी 2350 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

डाळींबाच्या (Pomegranate) 9555 क्रेटसची आवक झाली. प्रतवारी नुसार डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 116 ते 165 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 76 ते 115 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 46 ते 75 रुपये भाव मिळाला. तर डाळींब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या