राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला प्रति किलोला सर्वाधिक 275 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 9343 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 191 ते 275 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 116 ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 56 ते 115 रुपये भाव मिळाला.
डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 55 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. गहू सरासरी 2650 रुपये, हरभरा सरासरी 5700 रुपये, ज्वारीला किमान 1800 रुपये, जास्तीत जास्त 1900 रुपये, तर सरासरी 1850 रुपये.
ड्रॅगनच्या (Dragon) 296 कॅरेटची आवक झाली. ड्रॅगनला (Dragon) किमान 18 रुपये, जास्तीत जास्त 65 रुपये तर सरासरी 50 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. पेरूच्या 269 कॅरेटची आवक झाली. पेरूला किमान 11 रुपये, जास्तीत जास्त 22 रुपये तर सरासरी 15 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सुभाष मोटे यांनी दिली.




