राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी डाळिंबाला 225 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 1101 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 151 रुपये ते 225 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 ते 150 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 वरुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला.

मंगळवारी कांद्याला (Onion) प्रतिक्विंटल ला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 6512 गोण्यांची ची आवक झाली. कांदा नंबर एकला 1100 ते 1400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर दोन ला 800 ते 1050 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी (Onion) कांदा 400 ते 900 रुपये. जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. 35 गोण्यांना 1301 ते 1400 रुपये भाव मिळाला. 100 गोण्यांना 1201 ते 1300 रुपये भाव मिळाला. 250 गोण्यांना 1101 ते 1200 रुपये भाव मिळाला. 305 गोण्यांना 1001 ते 1100 रुपये भाव मिळाला. 2339 गोण्यांना 501 ते 1000 रुपये भाव मिळाला. 3483 गोण्यांना 100 ते 500 रुपये भाव मिळाला.




