Tuesday, October 22, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळिंब व सोयाबीनची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत डाळिंब व सोयाबीनची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला (Pomegranate) जास्तीत जास्त 350 रुपये प्रति किलोलोला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाची 5208 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 236 ते 350 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 131 रुपये ते 235 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 61 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 60 रुपये भाव मिळाला. पेरूच्या (Guava) 12 कॅरेटची आवक झाली. पेरूला 45 ते 60 रुपये तर सरासरी 50 रुपये भाव प्रतीकिलोला मिळाला. सीताफळाच्या 17 क्रेट्स ची आवक झाली. सीताफळाला किमान 10 रुपये, जास्तीत जास्त 90 रुपये तर सरासरी 60 रुपये प्रतीकिलोला भाव मिळाला. संत्री 5 ते 9 रुपये, तर सरासरी 7 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

- Advertisement -

गव्हाला 2500 रुपये सरासरी भाव मिळाला. बाजरीला किमान 2111 रुपये, जास्तीत जास्त 2350 रुपये, तर सरासरी 2230 रुपये. सोयाबीनची 113 क्विंटल ची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 4079 रुपये, जास्तीत जास्त 4351 रुपये तर सरासरी 4225 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 6925 रुपये. मकाला किमान 1945 रुपये, जास्तीत जास्त 2100 रुपये, तर सरासरी 2022 रुपये. ज्वारीला 2020 ते 2019 रुपये तर सरासरी 2060 रुपये. मुग सरासरी 4995 रुपये. उडीद सरासरी 4000 रुपये, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या