राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी डाळिंबाला जास्तीत जास्त 295 रुपये प्रति किलोलोला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाची (Pomegranate) 2878 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 181 ते 295 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 101 रुपये ते 180 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 56 ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 55 रुपये भाव मिळाला. सीताफळाच्या 71 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 15 रुपये, जास्तीत जास्त 80 रुपये तर सरासरी 30 रुपये प्रतीकिलोला भाव मिळाला. पेरू सरासरी 50 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.
गव्हाला 3105 ते 3131 रुपये तर सरासरी 3120 भाव मिळाला. मकाला किमान 1800 रुपये, जास्तीत जास्त 2100 रुपये, तर सरासरी 1950 रुपये. सोयाबीनची (Soybeans) 103 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 4025 रुपये, जास्तीत जास्त 4385 रुपये तर सरासरी 4250 रुपये भाव मिळाला. ज्वारीला 3050 ते 2175 रुपये तर सरासरी 2115 रुपये भाव मिळाला. बाजरीला 2520 रुपये भाव मिळाला.
कोल्हार बु. उपशाखेत ज्वारीला सरासरी 1946 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 44 क्विंटलची आवक झाली. सोयाबीन ला 3875 रुपये ते 4261रुपये तर सरासरी 4150 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.