Tuesday, March 25, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळिंब व सोयाबीनची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत डाळिंब व सोयाबीनची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी डाळिंबाला (Pomegranate) जास्तीत जास्त 225 रुपये प्रति किलो भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाची (Pomegranate) 1410 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 121 ते 225 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 81रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 80 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

सीताफळाच्या 290 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 5 रुपये, जास्तीत जास्त 45 रुपये तर सरासरी 25 रुपये प्रतीकिलोला भाव मिळाला. पेरूच्या 132 क्रेट्स ची आवक झाली. पेरूला (Guava) 7.50 ते 25.50 रुपये, तर सरासरी 20 रुपये. ड्रेगन फ्रुट च्या 17 क्रेट्स ची आवक झाली. ड्रेगन फ्रुट ला 10 ते 50 रुपये, तर सरासरी 30 रुपये भाव प्रतिकिलोला मिळाला.

सोयाबीनच्या (Soybeans) 24 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) 4136 रुपये ते 4300 रुपये तर सरासरी 4215 रुपये भाव मिळाला. मकाला 1775 ते 2000 रुपये तर सरासरी 1885 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 3050 रुपये भाव मिळाला. हरभरा (सफेद) 6326 रुपये सरासरी भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...