राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळिंबाला (Pomegranate) जास्तीत जास्त 100 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. बुधवारी राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 25 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 66 ते 100 रुपये किलो. डाळिंब नंबर 2 ला 46 ते 65 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 26 ते 45 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 5 ते 25 रुपये. चिकूच्या 3 कॅरेटची आवक झाली. प्रतीक्विंटल ला 3500 रुपये भाव मिळाला.
ज्वारीची 10 क्विंटल आवक झाली. ज्वारीला सरासरी 2180 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) किमान 5050 रुपये, जास्तीत जास्त 5216 रुपये तर सरासरी 5130 रुपये. गव्हाला सरासरी 2525 रुपये भाव मिळाला. सोयाबीन ला सरासरी 3760 रुपये. गव्हाच्या 11 क्विंटल आवक झाली. गव्हाला सरासरी 2700 रुपये भाव मिळाला. सोयाबीन (Soybeans) 2 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 3800 रुपये भाव मिळाला. बाजरीला सरासरी 2300 रुपये भाव मिळाला. ज्वारीला किमान 1700 रुपये, जास्तीत जास्त 1991 रुपये तर सरासरी 1850 रुपये भाव मिळाला.